दि बाबासाहेब देशमुख बँक आटपाडी एक हजार कोटीचा व्यवसाय करणार

Admin
By -
0

 दि बाबासाहेब देशमुख बँक 1000 कोटीचा व्यवसाय पूर्ण करणार असा विश्वास बँकेचे संस्थापक अमरसिंह बापूसाहेब देशमुख यांनी व्यक्त केला आटपाडीच्या दि बाबासाहेब देशमुख सहकारी बँक 27 वी वार्षिक सर्वसाधारण सभा दि आटपाडी एज्युकेशन सोसायटीच्या जिम्नॅशियम हॉलमध्ये पार पडली या सभेला बँकेचे अध्यक्ष दादासाहेब पाटील उपाध्यक्ष  जे जे देशपांडे मुख्य कार्यकारी अधिकारी बी एस पाटील आड मुुठेे संचालक सभासद कर्मचारी उपस्थित होते यावेळी बँकेचे आदर्श नियमित कर्जदारांचा सत्कार करण्यात आला.     अमरसिंह देशमुख म्हणाले 2027 पर्यंत एक हजार कोटीचा व्यवसायाचा टप्पा बँक पूर्ण करेल या दृष्टीने तयारी सुरू आहे                                           सभासदांना दहा टक्के लाभाश देण्याचा निर्णय घेतला दोन महिन्यात पंढरपूर आणि जत येथे शाखा सुरू निर्धार व्यक्त करण्यात आला बँकेचे उपाध्यक्ष देशपांडे म्हणाले बँकेला चार कोटी 24 लाख नफा झाला आहे बँकेकडे 455 कोटी  48 लाख  ठेवी आहेत 298 कोटी 44 लाख कर्ज वाटप केले आहे भाग भांडवल 19 कोटी बारा लाख आहे यावेळी सभासद दिनेश दबडे राजेंद्र देशमुख याने प्रश्न मांडले सभेतील सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले सभेचे प्रारंभी आटपाडी तालुक्याचे शिल्पकार काही बाबासाहेब देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले प्रस्ताविक जे जे देशपांडे यांनी केले अहवाल वाचन बीएस पाटील आडमुठे यांनी केले आर के देशमुख यांनी सूत्रसंचालन केले संचालक सावता माळी यांनी आभार मानले

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)