आटपाडीच्या नगरपंचायत निवडणुकीत कोट्यावधी रुपये खर्च करून विजयाची खात्री नसल्याने आता निवडणूक निकालाची प्रतीक्षा

Admin
By -
0

 नगरपंचायत आटपाडी पहिली पंचवार्षिक निवडणूकीचा‌ निकाल रविवार दिनांक 21 डिसेंबर रोजी लागणार आहे त्यामुळे या निवडणुकीत कोण विजयी होणार याबद्दल मतदान नतर जोरदार राजकीय चर्चा रंगली होती निकाल जसा जवळ येईल तसे निवडणुकीत उमेदवारीची धाकधूक वाढली आहे मतदानानंतर केलेले सर्वे त्यांचा कल व प्रत्यक्षात उमेदवार पार्टी नेत्यांनी कार्यकर्त्यांनी केलेली प्रयत्न यामध्ये मोठी विसंगती आहे नगरपंचायत निवडणुकीसाठी पहिल्यांदाच मतदारावर वारे माप पैसा खर्च करून जिंकून येण्याच्या दृष्टीने लाखो रुपये खर्ची झाले नगर पंचायतीतील 17 नगरसेवक व एका नगराध्यक्ष पदासाठी कोट्यावधी रुपये खर्च करून विजयी होण्यासाठी निवडणुकीत भाजप शिवसेना तीर्थक्षेत्र विकासासाठी आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या पक्षाने उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते कसलेही परिस्थितीत निवडणूक जिंकायची या ईषनै उमेदवारी केली गेली मतदारांना सर्वच उमेदवार कडून आर्थिक लाभ झाला त्यामुळे मतदारांनी नेमके कोणाच्या पारड्यात मत टाकले याचा अंदाज करता करता उमेदवार नेते यांनाही खात्री देता येत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे तरी देखील आपणच निवडून येणार आपल्याच पक्षाची गटाची सत्ता येणार असा विश्वास व दिलासा नेते मंडळी देत आहेत या निवडणुकीत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष  अमरसिंह देशमुख शिवसेनेचे नेते व सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख भारत पाटील आनंदराव पाटील राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष अनिल शेठ पाटील यांच्या राजकीय भूमिका महत्वाच्या ठरले आहेते आता 21 तारखेपर्यंत निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत पैजा व अंदाज सुरूच राहणार आहेत रविवारी दुपारी बारा वाजेपर्यंत निवडणूक निकाल हाती येईल मतमोजणीसाठी पंधरा टेबल मांडण्यात येणार आहेत त्यामुळे लवकर निकाल हाती येऊन नगरसेवक व नगराध्यक्ष निवड होणार आहे तोपर्यंत सर्वांना निकालाची प्रतीक्षा लागली आहे

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)