आटपाडी नगरपंचायत निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदासाठी दोन उमेदवार तर नगरसेवक पदासाठी सात उमेदवारी अर्ज आज दाखल

Admin
By -
0

 आटपाडी नगरपंचायत पंचवार्षिक निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदासाठी दोन उमेदवारी अर्ज आज दाखल झाले तर नगरसेवकपदासाठी सात उमेदवारी अर्ज दाखल झाले आटपाडी नगरपंचायतीचे नगराध्यक्ष पद नागरिकांचा मागास प्रवर्ग आहे शिवसेना शिंदे गटातर्फे आप्पासो नानासो माळी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तर अपक्ष म्हणून हरीश धनाजी खिलारी यांनी अर्ज दाखल केला प्रभाग सात मधून शिवसेनेतर्फे शहाजी यशवंत जाधव तर तीर्थक्षेत्र विकास आघाडी तर्फे पोपट मारुती पाटील यांनी सर्वसाधारण जागेसाठी अर्ज दाखल केला प्रभाग 12 मधून डॉक्टर विनय जयराम पत्की यांनी दोन अर्ज सर्वसाधारण जागेसाठी  दाखल केले प्रभाग तेरा मधून गणेश प्रभाकर माने अपक्ष म्हणून नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी अर्ज दाखल केला प्रभाग 15 मध्ये शिवसेनेतर्फे अर्चना मनोज नांगरे तर समाबाई भिमराव काळे यांनी अर्ज दाखल केला यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तानाजीराव पाटील व त्यांचे समर्थक शिवसेनेचे उमेदवाराचा अर्ज दाखल करताना उपस्थित होते निवडणूक निर्णय अधिकार तहसीलदार शितल बंडगर व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव हजारे म्हणून काम पाहत आहेत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुक उमेदवारांची कागदपत्र जमा करण्यासाठी धावपळ सुरू आहे या निवडणुकीत भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस या नेत्यांच्या युतीबाबत भूमिका अजूनही स्पष्ट न झाल्यामुळे कार्यकर्ते संभ्रमावस्थातेत आहेत

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)