आटपाडी नगरपंचायत पंचवार्षिक निवडणुकीसाठी नगरसेवकपदासाठी आठ उमेदवारी अर्ज दाखल झाले प्रभाग चार मधून जयवंत रामू माने यांनी भाजप तर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला प्रभाग सहा मधून प्रकाश जगन्नाथ पाटील तीर्थक्षेत्र विकास आघाडी पंढरपूर प्रभाग आठ मधून निर्मला उत्तम काळेबाग शिवसेना प्रभाग 16 मधून अक्षय दिगंबर जाधव अपक्ष विनायक बाळकृष्ण पाटील भाजप अमोल जयसिंग घमे अपक्ष प्रभाग 17 मधून मीनाक्षी मनोज कुमार पाटील तीर्थक्षेत्र विकासासाठी व अपक्ष असे दोन आज दाखल केले आज नगराध्यक्ष पदासाठी एकही अर्ज दाखल झाला नाही आज एकूण अखेर काल व आज मिळून नगरसेवक पदासाठी 15 अर्ज व नगराध्यक्ष पदासाठी दोन अर्ज झाले आहेत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नेते भारत तात्या पाटील आनंदराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती आटपाडी नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर व अमरसिंह देशमुख यांच्या युतीबाबत अद्याप भूमिका स्पष्ट झाल्या नसल्याने उमेदवारी अर्ज दाखल करताना कार्यकर्त्यामध्ये संभरावस्था आहे भाजपचे नेते व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी भाजपमधील दोन गटांमध्ये समन्वयसाठी घेतलेली बैठकी निर्णय अद्याप कार्यकर्त्यांना सांगितलं नसल्यामुळे कार्यकर्ते आपापल्या गटातर्फे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी सुरू आहे शिवसेनेच्या शिंदे गटातर्फे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांचे समर्थक स्वतंत्र निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे भारत तात्या पाटील आनंदराव पाटील यांच्या समर्थक तीर्थक्षेत्र विकास आघाडी पंढरपूर नावाने उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डी एम पाटील यांनी स्वतंत्र उमेदवार अर्ज दाखल करण्याची तयारी केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच नेतेे माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख युवक जिल्हाध्यक्ष अनिल पाटील यांचेही उमेदवार स्वतंत्र अर्ज भरण्याची तयारी सुरू आहे एकंदरीत युती व आघाडीबाबत निर्णयानंतरच निवडणुकीबाबत पॅनल होणार आहेत अर्ज भरण्यासाठी शनिवार व सोमवार दोन दिवस शिल्लक राहिले आहेत त्यामुळे या दोन दिवसासाठी अर्ज भरण्याची गर्दी होणार आहे
आटपाडी नगरपंचायत नगरसेवक पदासाठी आठ उमेदवार दाखल
By -
November 14, 2025
0
Post a Comment
0Comments