मोफत वाचनालय, आटपाडी येथे वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

Admin
By -
0


 

📰 मोफत वाचनालय, आटपाडी येथे वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

आटपाडी – माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन मोफत वाचनालय, आटपाडी येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात आश्रम शाळेचे सहशिक्षक सन्माननीय गोडसे सर यांच्या हस्ते डॉ. कलाम यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. त्यानंतर आपल्या माणदेशातील “दिवाळी आवाज” या अंकाचे प्रकाशन संपादक रवीकुमार मगदूम यांच्या हस्ते, वीरभद्र लिगाडे (आप्पा), आशांक राजमाने आणि सतीश भिंगे अशोक जाधव रोहीत बिलै यांच्या उपस्थितीत पार पडले.

यानंतर पुस्तक प्रदर्शन भरवण्यात आले. यामध्ये यावर्षी प्रकाशित झालेल्या अनेक दिवाळी अंकांचे प्रदर्शन करण्यात आले — साप्ताहिक सकाळ, गृहशोभिका, बालकुमार, साधना दिव्यांक, युवा साधना, साधना वार्षिक अंक तसेच अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र (ऑक्टोबर अंक) यांचा समावेश होता.

वाचनालयातर्फे वाचकांना यावर्षीच्या दिवाळी अंकांचे वाचन करण्याचे आव्हान करण्यात आले. तसेच “वाचन आकलन स्पर्धा” घेण्यात येणार असून, इच्छुकांनी किमान १० पुस्तके वाचून स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या शेवटी सुनील भिगेयांनी आभार प्रदर्शन केले.

📚 “वाचनातूनच विचारांचे संवर्धन होते; वाचक समाजच जागरूक समाज घडवतो,” असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)