आटपाडीत ग दि माडगूळकर शासकीय अल्पकालीन अभ्यासक्रमास शुभारंभ

Admin
By -
0


 ग. दि. माडगूळकर आयटीआय आटपाडीत अल्पकालीन व्यवसाय अभ्यासक्रमाचा शुभारंभ


आटपाडी (प्रतिनिधी):

उद्योगांच्या वाढत्या गरजेनुसार युवक-युवतींना कौशल्यविकासाद्वारे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) मध्ये अल्पमुदतीचे व अल्पदरातील कौशल्यविषयक अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत.


या उपक्रमाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी, दिनांक ८ रोजी दुपारी तीन वाजता ऑनलाइन पद्धतीने करण्यात आला. या अनुषंगाने ग. दि. माडगूळकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आटपाडी येथेही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.


या प्रसंगी प्रमुख उपस्थितीत माननीय प्रकाश नामदास (आटपाडी एज्युकेशन सोसायटी), प्राध्यापक संताजी देशमुख, आय.एम.सी. सदस्य सतीश भिंगे, प्रशिक्षण सल्लागार शामसुंदर ठोंबरे, गणपत बाणेकोल, सर्जेराव शिसाळ तसेच अन्य निदेशक वर्ग उपस्थित होते.


या उपक्रमांतर्गत तीन महिन्यांच्या कालावधीचे अल्पमुदतीचे प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार असून, उद्योग व सेवाक्षेत्रातील मागणी लक्षात घेऊन अभ्यासक्रमांची रचना करण्यात आली आहे. हे प्रशिक्षण तरुणांना अल्पावधीत रोजगारक्षम बनविण्यासाठी मोठी संधी ठरणार आहे.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)