आटपाडी तालुक्यातील जिल्हा परिषद चार जागेसाठी 17 उमेदवार तर पंचायत समितीचे आठ जागेसाठी 26उमेदवार रिंगणात

Admin
By -
0

 आटपाडी तालुक्यातील जिल्हा परिषद चार जागेसाठी 17 उमेदवार  तर पंचायत समितीचे आठ जागेसाठी 26उमेदवार रिंगणात आहेत आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता जिल्हा परिषद निवडणुकीसाठी 30 तर पंचायत समिती 68 उमेदवारांनी आज अर्ज मागे घेतले तालुक्यात भाजप विरोधात शिवसेना अशा उमेदवाराला प्रमुख लढत होत आहे भाजप तर्फे दिघंची गटातून कल्लाप्पा दादू कुटे निंबवडे गटातून माधवी ब्रह्मदेव पडळकर करगणी गटातून दादासाहेब आनंदा हुबाले खरसुंडी  गटातून चंद्रकांत श्रीरंग भोसले  यांना भाजप पक्षाने उमेदवारी दिली आहे तर शिवसेनेने शिंदे गट दिघंची जिल्हा परिषद गट पृथ्वीराज तानाजी पाटील निंबवडे विद्याताई सचिन मोटे खरसुंडी जयदीप मोहनराव भोसले यांना उमेदवारी दिली आहे तर करगणी जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट विनायकराव मासाळ यांना उमेदवारी दिली आहे विनायकराव मासाळ यांना शिवसेनेचे आमदार सुहास बाबर सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची संचालक तानाजीराव पाटील माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अनिल शेठ पाटील यांनी पाठिंबा दिला आहे काँग्रेस पक्षाने करगणी जिल्हा परिषद मतदार संघातून राहुल गायकवाड यांना एकमेव उमेदवारी देऊन काँग्रेसचे अस्तित्व टिकवले आहे शिवसेना उद्धव ठाकरे गटाने खरसुंडी जिल्हा परिषद गट शिवसेनेचे तालुकाध्यक्ष शेखर निचळ यांना उमेदवारी दिली आहे ऊबाटा तीन पंचायत समिती गणात उमेदवार उभे केले आहेत राज ठाकरे यांच्या मनसेतर्फे तालुका अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी करगणी जिल्हा परिषद गटात एकमेव उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवला आहे आटपाडी नगरपंचायतीच्या निवडणूक निकालानंतर तालुक्यातील राजकीय समीकरण बदललेली आहेत त्यामुळे शिवसेना विरोधात भाजप अशी प्रमुख निवडणूक लढत होत आहे आमदार गोपीचंद पडळकर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख जिल्हा परिषद समाज कल्याणचे माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी ही निवडणूक राजकीय प्रतिष्ठेची केली आहे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हणमंतराव देशमुख माजी जिल्हा परिषद सदस्य व विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जनार्दन झिबल यांनी भाजप पक्षात प्रवेश केला आहे तर आमदार सुहास बाबर यांनी या निवडणुकीत प्रत्यक्ष सहभाग घेतल्यामुळे आटपाडी तालुक्यात भाजप विरोधात शिवसेना असा सामना रंगला आहे                                                            भाजप पंचायत समिती गणातील उमेदवार  दिघंची वंदना संदीप शिंदे विटलापूर वैभव कैलास हेगडे निंबवडे जयवंत राजाराम सरगर घरनिकी वैशाली रमेश कातुरे करगणी संभाजीराव शिवाजीराव पाटील माडगूळे दादासाहेब विठोबा मोटे खरसुडी लता अर्जुन पुजारी नेलकरंजी पोर्णिमा विजय मारगुडे हे उमेदवार रिंगणात उतरले आहेत शिवसेना पक्षातर्फे पंचायत समिती गण दिघंची कल्पना देवेंद्र पुसावळे विटलापूर दिलीप अण्णा हेगडे करगणी दत्तात्रय हणमत पाटील माडगुळे रामदास दत्तात्रय सूर्यवंशी खरसुंडी मीनाक्षी उमेश पुजारी नेलकरंजी सुनिता दत्तात्रय सरगर निंबवडे सचिन नाना मोटे घरनिकी अहिल्या शरद पुकळे निवडणूक रिंगणात उतरले आहेत रिपब्लिक न पार्टी ऑफ इंडिया करगणी महेश श्रीरंग सरगर यांनी अपक्ष उमेदवारी दिलीआहे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातर्फे जि प एक व तीन गणातून निवडणूक लढवत आहेत शिवसेना उद्धव ठाकरे गट जिल्हा परिषद खरसुंडी जिल्हा परिषदगट शेखर सोमनाथ निचळ खरसुंडी पंचायत समिती गण मयुरी रोहित भांगे नेलकरंजी पंचायत समिती गण अंजली अजित खंदारे विटलापूर  गण विशाल दिलीप चंदनशिवे निवडणूक लढवत आहेत करगणी जिल्हा परिषद गटातून धनाजी तुकाराम जावीर अपक्ष दिघंची जिल्हा परिषद गटातून संदेश नागेश खटके अपक्ष निलेश बयाजी धोत्रे अपक्ष खरसुंडी जि प गटातून सत्यवान अप्पासाहेब गलांडे अपक्ष शफिक नूर मोहम्मद तांबोळी अपक्षअर्जुन नाना जावीर अपक्ष निवडणूक लढवत आहेत एकंदरीत आटपाडी तालुक्यात चार जिल्हा परिषद जागेसाठी सतरा उमेदवार तर पंचायत समितीचे आठ गणासाठी 26 उमेदवार उतरले आहे भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)