आटपाडी तालुक्यात जिल्हा परिषद चार जागेसाठी 67 पंचायत समितीच्या आठ गणासाठी 125 उमेदवारी अर्ज दाखल

Unknown
By -
0
आटपाडी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या चार जागे साठी67 पंचायत समितीच्या आठ गणासाठी 125एवढे एकूणअर्ज शेवटच्या दिवशी दाखल झाले आटपाडी तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणुकीमध्ये शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आदी पक्षा पक्षातील उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे निवडणूक प्रतिष्ठित झाले आहे नुकतीच आटपाडी नगरपंचायतीची निवडणूक झाली त्यामुळे राजकीय वातावरण तापले होते भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांनीही निवडणूक राजकीय प्रतिष्ठेची केली आहे भाजपचे नेते जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख आमदार सुहास बाबर आमदार गोपीचंद पडळकर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा काँग्रेसचे युवक अध्यक्ष अनिल पाटील तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नेते भारत पाटील आनंदराव पाटील यांच्या गटाने आपल्या कार्यकर्तेच्या बैठका व सभा घेऊन जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका लढवण्याचे दृष्टीने जोरदार तयारी केली आहे त्यामुळे अर्ज भरण्याच्या शेवटच्या दोन दिवसात मोठ्या प्रमाणात इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत परंतु तर्फे  ए बी फार्म आज शेवटच्या दिवशी दिल्यामुळे पक्षाचे उमेदवार निश्चित झाले आहेत उमेदवारी अर्जाची छाननी व नंतर माघारी घेण्याची मु मुदत संपल्यानंतर निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे गेल्या दोन दिवसात आटपाडी तालुक्यातील अनेक नेत्यांनी पक्षांतर प्रवेशाची कार्यक्रम धूम धडाक्यात पार पडले राष्ट्रवादी काँग्रेसचे हनुमंतराव देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर काँग्रेसचे नेते जयदीप भैय्या भोसले याने शिवसैनिक प्रवेश केला तर शिवसेनेचे चंद्रकांत भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला एकंदरीत दोन-तीन दिवस झाले नेते मंडळी कार्यकर्त्यांचे प्रवेश निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार सुरू आहेत त्यामुळे ही निवडणूक अटीतटीची व राजकीय प्रतिष्ठेची होणार आहे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व शिवसेनेचे नेते तानाजीराव पाटील यांनी आपल्या मुलगा पृथ्वीराज पाटील यांचा दिघंची जि प गटातून अर्ज केला तर जिल्हा परिषदेच समाज कल्याण माजी  सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी आपली पत्नी माधवी यांचा उमेदवारी अर्ज निंबवडे जिल्हा परिषद गटात दाखल केला त्यांच्या विरोधात शिवसेनेतर्फे मुंबईचे आयकर आयुक्त सचिन मोटे यांची पत्नी विद्या मोठे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला भाजपचे तालुकाध्यक्ष दादासाहेब हुबाले यांनी करगणी जिल्हा परिषद गटातून उमेदवारी दाखल केली तर राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष विनायकराव मासाळ याने करगणी जिल्हा परिषद गटात उमेदवारी अर्ज दाखल केला तालुक्यातील दिघंची आटपाडी करगणी खरसुंडी या जिल्हा या चार जिल्हा परिषद गटात भाजप विरुद्ध शिवसेना अशी प्रमुख लढत आहे

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)