नगरपंचायत आटपाडी विविध विषय समितीच्या सभापती निवडी बिनविरोध

Admin
By -
0

 नगरपंचायत आटपाडीच्या विविध विषयाच्या सभापतीच्या निवडी बिनविरोध पार पडल्या स्थायी समिती सभापती म्हणून नगराध्यक्ष यु टी जाधव तर महत्वाचे खातेअसणारे सार्वजनिक बांधकाम समितीचे सभापती म्हणून बाळासाहेब हजारे यांची निवड करण्यात आली नियोजन व विकास समिती सभापतीपदीऋषिकेश देशमुख महिला व बालकल्याण समिती सभापती म्हणून उपनगराध्यक्ष मीनाक्षी मनोज पाटील पाणीपुरवठा व जल निसारण समिती सभापती डॉक्टर जयंत पाटील स्वच्छता व आरोग्य समिती संध्या अनिल पाटील यांची सभापती म्हणून निवड घोषित करण्यात आली नगरपंचायत कार्यालयात मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव हजारे यांच्या उपस्थितीत समिती निवडीचा कार्यक्रम पार पडला आटपाडी नगरपंचायत निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटाला आठ नगरसेवक निवडून आले होते तर सात सदस्य भाजपचे होते एक सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व एक सदस्य तीर्थक्षेत्र विकास आघाडी असे नगरसेवक निवडून आले होते उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध झाली त्यामुळे विविध विषय समितीच्या सभापतीच्या निवडीही बिनविरोध झाल्या व भाजपचे पक्षाचे गट नेते नगरसेवक ऋषिकेश देशमुख व डॉक्टर जयंत पाटील या दोघांना सभापती म्हणून निवड झाली तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जिल्हा युवक अध्यक्ष अनिल पाटील यांच्या पत्नी संध्या अनिल पाटील यांना सभापती देण्यात आले उपनगराध्यक्ष मीनाक्षी पाटील व नगराध्यक्ष यु टी जाधव यांनाही सभापती पद देण्यात आले एकंदरीत शिवसेनेला दोन भाजपला तीन तीर्थक्षेत्र विकास आघाडीला एक अशी सभापती पदाची वाटणी करण्यात आली सभापती निवडीनंतर समर्थ कार्यकर्त्यांनी निवडीचा विजय उत्सव साजरा केला एकंदरीत नगरपंचायत निवडणुकी नंतर राज्यातील महायुतीच्या कारभारासारखा पॅटर्न आटपाडी नगरपंचायत निवडी राबवला आटपाडी तालुक्यातील नेते भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर शिवसेनेचे आमदार सुहास बाबर माजी आमदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र अण्णा देशमुख भारत पाटील आनंदराव पाटील जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व भाजपचे नेते अमरसिंह देशमुख सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची संचालक व आमदार सुहास बाबर यांचे समर्थक तानाजीराव पाटील यांनी नगरपंचायत उपनगराध्यक्ष निवडीपासून सामंजशी भूमिका घेतली असल्याचे दिसून येते त्यामुळे नगरपंचायतीचा विकास कामे गतीने होतील असा विश्वास कार्यकर्त्यांना वाटत आहे नगराध्यक्ष व नगरसेवक निवडीनंतर संघर्षाची भूमिका टाळून सर्व समावेशक सभापतीच्या निवडी करण्यात यश आले आहे अमरसिंह देशमुख यांनी नगरपंचायत कारभारात विशेष लक्ष केंद्रित करून शहराच्या सुधारण्याची दृष्टीने नगरसेवकांच्या बैठका प्रशासकीय बैठका शनिवारच्या आठवड्यातील बाजारातील ग्राहक विक्रेते व्यापारी यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करण्यासाठी सुरू केले हालचाली सुरू केले आहेत सर्वच पक्षाचे नगरसेवक ऍक्टिव्ह मोड वर आले आहेत सभापती निवडीमध्ये शिवसेने च्या नगरसेवकांना झुकते माप देण्यात आले आहे महत्वाचे बांधकाम खाते शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेब हजारे यांना देण्यात आले

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)