आटपाडीत मंगलमूर्ती फ्रुट पंढरीनाथ नागणे यांचा शेतकऱ्याकडून सत्कार

Admin
By -
0

 शेतकऱ्यांकडून अनोखा गौरव सोहळा..


आटपाडीच्या डाळिंब अडतीचे कौतुक: 


      भगतवाडी, अकलूज, इंदापूर, पिलीव, येथील शेतकरी वर्गाकडून आटपाडी बाजार समितीतील सर्वसृत असणाऱ्या मंगलमूर्ती फ्रुट सप्लायर्स या अडतीचे सर्वेसर्वा व माजी संचालक पंढरीनाथ (नाना) नागणे यांचा गौरव करत आपल्या आटपाडीशी नाते दृढ झाल्याचे सांगत शेतकऱ्यांनी भावना व्यक्त केल्या...


       आटपाडी बाजार समितीच्या सौदे बाजारामुळे आमचे घट्ट नाते मंगलमूर्ती शी निर्माण झाल्याचे शेतकरी सांगतात.


भगतवाडी येथील प्रगतशील शेतकरी विठ्ठल फडतरे व रामचंद्र फडतरे यांच्या सोबतच तेथील संपूर्ण गाव मंगलमूर्ती शी जोडले गेले व चांगल्या दिल्या गेलेल्या दरामुळे संपूर्ण गावातील शेतकऱ्यांना लाखो रुपयांचे उत्पन्न भेटत गेले, व डाळिंब बागायत क्षेत्र ही वाढू लागले आहे, 


तसेच पिलीव येथील प्रगतशील शेतकरी रामचंद्र रजपूत (भैस) यांनी ही पिलीव परिसरातील शेतकरी मिळून भेटून सत्कार समारंभ साजरा केला, रामचंद्र रजपुत (भैस) यांचा मार्केट तर्फे गेल्या 2-4 वर्षांमध्ये सर्वाधिक माल आणणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये प्रथम क्रमांक भेटला आहे, त्यांचा दरवर्षी 125 ते 150 टन माल मंगलमूर्ती फ्रुट ला विक्री करण्यास असतो... 


परिणामी याचीच कृतज्ञता म्हणून  परिसरातील शेतकरी वर्गाने गावाकऱ्यांच्या वतीने विशेष सत्कार सोहळा आटपाडी बाजार समितीमध्ये येथे फटाके वाजवून आनंद साजरा केला व मा. पंढरीनाथ (नाना) नागणे व मा.दिपकशेठ नागणे यांचा फेटा, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला..


शेतकरी वर्गातील हा आनंद व उत्साह पाहून नागणे  यांचे ही मन भारावून गेले.

इतर पिकांचा विचार करता डाळिंब हे पीक उत्पन्नाच्या दृष्टीने लाभदायक आहे त्यामुळे मोठया प्रमाणात डाळिंब लागवड वाढताना दिसते.

महाराष्ट्र सह इतर गुजरात, कर्नाटक,राजस्थान, आंध्रप्रदेश राज्यातही डाळिंब क्षेत्र वाढत आहे.

तरीही जागतिक बाजारपेठेत महाराष्ट्रातील हिस्सा हा मोठा आहे..


आमच्या मंगलमूर्ती उद्योग समूहामार्फत शेतकरी व व्यापारी वर्गाला आवश्यक सर्व सोई-सुविधा पुरवण्यात येतात व शेतकऱ्याचा माल  आणल्यापासून तो उतरवून घेऊन मालाचे शॉर्टींग करून पारदर्शक सौदे करून व्यापाऱ्यांना विक्री करणे यामुळेच येथील व्यवस्थापन व सर्वोत्तम सेवा यामुळेच सांगली, सातारा,सोलापूर,पुणे,अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, कर्नाटकातील गुलबर्गा, बेळगाव येथील ही शेतकऱ्यांना मंगलमूर्ती फ्रुट ची पसंती असताना दिसते..

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)