आटपाडीत आज जिल्हा परिषद20 आणि पंचायत समिती9 तब्बल 29 उमेदवार अर्ज दाखल
-
आटपाडी ता. 20- आटपाडी तालुक्यात आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी निंबवडे गटातील भाजप आणि शिवसेना उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केले. चार जिल्हा परिषदेच्या गटातून वीस आणि पंचायत समितीच्या आठ गणांतून नऊ असे ऐकून 29 उमेदवारी अर्ज दाखल झाले. आज अनेक प्रमुख उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी आज भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन समाज पार्टी आणि अपक्षातून उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. निंबवडे गटातील समाज कल्याणचे माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्या पत्नी माधवी पडळकर यांचा उमेदवारी अर्ज आमदार गोपीचंद पडळकर यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करून दाखल केला. तर याच गटातून आयकर उपयुक्त डॉ. सचिन मोटे यांच्या पत्नी विद्या मोठे यांनीही जोरदार शक्ती प्रदर्शन करून शिवसेनेतून उमेदवारी अर्ज दाखल केला. दोन्हीही उमेदवारांनी मोठी पदयात्रा काढली होती. यामध्ये मोठ्या संख्येने तरुण आणि महिलांनी सहभाग घेतला होता. उर्वरित गटातील उमेदवारांनी कसलेही शक्ती प्रदर्शन न करता उमेदवारी अर्ज दाखल केले.
जिल्हा परिषद गटनिहाय स्थिती:
खरसुंडी गट: शेखर सोमनाथ निचळ (उबाटा शिवसेना), मोहन सोनू बागल ( अपक्ष), जयदीप मोहनराव भोसले( शिवसेना आणि अपक्ष), चंद्रकांत श्रीरंग भोसले(भाजप), अर्जुन नाना जावीर (अपक्ष ), शरद मोहनराव भोसले (शिवसेना आणि अपक्ष).
निंबवडे गट: माधवी ब्रम्हदेव पडळकर (भाजप आणि अपक्ष), विद्या सचिन मोटे (शिवसेना आणि अपक्ष), प्राजक्ता दत्तु पावणे (अपक्ष). करगणी गट: विनायक मारुती मासाळ (राष्ट्रवादी काँग्रेस), पृथ्वीराज तानाजी पाटील (शिवसेना).
दिघची गट: प्रणव सूर्यकांत गुरव, (भाजप) मुबारक हिरु तांबोळी (शिवसेना ), गोरखनाथ आप्पा चव्हाण (अपक्ष). पंचायत समिती गण निहाय- खरसुंडी गण- मयुरी रोहित भांगे(शिवसेना आणि अपक्ष), अंजली राहुल गुरव (भाजप ).
घरनिकी गण- वैशाली रमेश कातुरे (भाजप).
विठलापूर गण- कोमल देवानंद जावीर (बहुजन समाज पार्टी).
निंबवडे गण- अहिल्या शरद पुकळे (शिवसेना), सतीश हरिबा मुढे (राष्ट्रवादी काँग्रेस), सचिन नाना मोटे( शिवसेना आणि अपक्ष) बंडू राजाराम मंडले (अपक्ष).
तालुक्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पार्श्वभूमीवर छोट्या मोठ्या बैठका, गुप्त बैठका, उमेदवारांचे शक्ती प्रदर्शन यामुळे वातावरण तापले असून आता शेवटच्या दिवशी किती उमेदवारी अर्ज दाखल करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Post a Comment
0Comments