सौ जयश्री देशमुख अपघातात ठार

Admin
By -
0

 

दिघंची हायस्कूल पर्यवेक्षक  सौ जयश्री रामचंद्र देशमुख वय 54  आज दुपारी कार अपघातात ठार झाल्या दहिवडी  महसवड रस्त्यावर आज दुपारी तीन वाजता अपघात झाला या अपघातात त्यांचे पती रामचंद्र देशमुख जखमी  झाले पुण्याहून  आटपाडी आपल्या पतीसह स्वतःच्या कार क्रमांक एम एच दहा सी ए 3624 टाटा बोल्ट या गाडीतून येत होते महसवड जवळ  रस्त्याच्या कडेला असणाऱ्या संरक्षक पत्र्याच्या लोखंडी बारला कारने जोरदार धडक दिली या धडकेत कार मध्ये लोखंडी पाईप घुसल्या त्या पाईपा जयश्री यांच्या शरीरात घुसल्या तर वाहन चालवणारे रामचंद्र देशमुख जखमी होऊन बेशुद्ध झालेते ते बचावले  दोघांनाही ग्रामीण रुग्णालय दहिवडी ते उपचारासाठी नेण्यात आले सौ जयश्री देशमुख यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केले रात्री उशिरा आटपाडी ये थे त्यांचा पार्थिव आटपाडी येथे देशमुख गल्लीत आणण्यात आला  प्रशांत दामले यांच्या गेला माधव कुणीकडे या नाटकात काम करणाऱ्या रोहीत देशमुख या कलाकार यांच्या सौ जयश्री आई आहेत रोहीत हा पुण्यात असतो त्याचा काल बालगंधर्व येथे नाट्यप्रयोग होता दिवाळी सुट्टी साठी देशमुख दापत्य पुणे येथे गेले होते काल रोहीतचा नाट्य प्रयोग रात्री पाहून आज सकाळी पुण्याहून आटपाडी येत असताना दुर्दैवी अपघात घटना घडली अपघाताची बातमी कळताच सर्वांनी हळहळ व्यक्त केली  सौ जयश्री देशमुख आटपाडी एज्युकेशन सोसायटीमध्ये भवानी विद्यालय आटपाडी येथील शिक्षिका का म्हणून काम करत होते बढती मिळाल्याने त्या दिघंची हायस्कूल येथे पर्यवेक्षिका म्हणून काम करत होत्या.








Post a Comment

0Comments

Post a Comment (0)