सुहास बाबर, वैभव पाटील, राजेंद्रआण्णा देशमुख यांच्यात तिरंगी लढत
खानापूर विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत प्रमुख नेत्यांचे ,तिरंगी निवडणूक चुरशीने होणार
28 उमेदवारांचे 35 उमेदवारी अर्ज वैध झाले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आज सोमवार दि. 4 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत शेवटची मुदत होती. त्यामुळे आजच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण 14 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे एकूण 14 निवडणूकीच्या रिंगणात राहिले आहेत. खानापूर मतदारसंघातील निवडणूक तिरंगी होणार असल्याचे स्पष्ट झाले.
माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न केले. परंतु त्यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनीही बंडाची भूमिका स्वीकारत अपक्ष अर्ज उमेदवारी अर्ज दाखल होता. तर माजी समाजकल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी देखील निवडणूक लढविण्याचा निर्धार करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. विधानसभा निवडणुकीत दाखल केलेला उमेदवारी माघार घेऊ नये निवडणूक लढावी, असा आग्रह देशमुख आणि पडळकर गटाच्या कार्यकर्त्यांनी धरला होता. त्यामुळे देशमुख आणि पडळकर यांचे उमेदवारी अर्ज मागे घेतले जाणार की नाही ? याकडेच सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. अखेरच्या क्षणी फक्त ब्रह्मानंद पडळकरांनी उमेदवारी अर्ज मागे घेत निवडणूकीतून माघार घेतली.
निवडणूकीच्या रिंगणात सुहास अनिलराव बाबर (शिवसेना), वैभव सदाशिव पाटील, (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार), अजित धनाजी खंदारे (बहुजन समाज पार्टी), राजेश रामचंद्र जाधव (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), संग्राम कृष्णा माने (वंचित बहुजन आघाडी), भक्तराज रघुनाथ ठिगळे (प्रहार जनशक्ती पक्ष), उमाजी मोहन चव्हाण (राष्ट्रीय समाज पक्ष), संभाजी जगन्नाथ पाटील (अपक्ष), संतोष सुखदेव हेगडे (अपक्ष), भरत जालिंदर पवार (अपक्ष), नाथजीराव उर्फ राजेंद्र रस्तुम देशमुख (अपक्ष), दादासो कोंडीराम चंदनशिवे (अपक्ष), उत्तम शामराव जाधव (अपक्ष), अंकुश महादेव चवरे (अपक्ष) या 14 उमेदवारांचे उमेदवारी अर्ज राहिले आहेत.
Post a Comment
0Comments