आटपाडीच्या शनिवार आठवड्यात मोबाईलचे मोठ्या प्रमाणात चोरी

Admin
By -
0

आटपाडीच्या शनिवारच्या आठवडा बाजारात मोबाईल चोरीचे प्रकार वाढले आहेत मोठ्या प्रमाणात बाजारात येणाऱ्या ग्राहक व्यापारी यांचे  मोबाईल हँडसेटचोरीस जात आहेत आटपाडी पोलीस ठाण्यात आठ जणांनी एकाच दिवशी मोबाईल चोरी गेल्याच्या तक्रारी केल्या आहेत आटपाडी चा शनिवारचा आठवडा बाजार शुक्र ओढा परिसरात बाजार पटांगण ते राजाराम बापू हायस्कूल रोड लगेच भरतो सध्या प्रचंड उन्हाळा असल्यामुळे सकाळी गर्दी असते तर दुपारून पाच नंतरही बाजारात खरेदीसाठी ग्राहक येत असतात त्यामुळे गर्दीचा फायदा घेत भुरटे चोर खिशातील मोबाईल चोरून नेत आहेत प्रत्येक आठवड्या बाजारात मोबाईल चोरीची घटना वाढल्या आहेत आटपाडी पोलीस ठाण्यातही अनेक मोबाईल धारकांनी मोबाईल हरवला व चोरीच्या तक्रारी दिल्या आहेत गर्दीचा फायदा घेत भाजीपाला खरेदी करणाऱ्या ग्राहकांकडे लक्ष ठेवून सराईतपणे जास्त किमतीचे मोबाईल चोरी करण्याचा प्रकार वाढल्यामुळे बाजारात येणारे व्यापारी ग्राहक नागरिक वाहन चालक महिलांमध्ये ज्येष्ठ नागरिकांमध्ये चोरीचे भीतीचे वातावरण पसरले आहे या ठिकाणी पथदिवेची सोय करावी दिवसभर पोलीस बंदोबस्त ठेवावा या रस्त्यावर सीसीटी कॅमेरे बसवावीत अशी बाजार करून ची मागणी आहे आटपाडी बाजारात मोबाईल घेऊन येणे चोरीस निमंत्रण आहे

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)