नगरपंचायत आटपाडीच्या निवडणुकीसाठी नगरसेवकपदासाठी उमेदवारी दाखल केलेल्या सात अपक्ष उमेदवारांनी आज अर्ज मागे घेतले प्रभाग सहा मधून राहुल मोहन देशमुख प्रभाग 10 मधून नितीन चैताली सागर प्रभाग 12 प्रथमेश प्रफुल भिंगे प्रभाग 14 जानवी दादासाहेब पाटील प्रभाग 15 सुवर्णा दिलीप शिंदे प्रभाग 15 रेखा अजित माळी प्रभाग 16 अमोल जयसिंग घमे या उमेदवारांनी अर्ज मागे घेतले 17 नगरसेवक पदासाठी 197 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते नगराध्यक्ष पदासाठी 11उमेदवार अर्ज शिल्लक आहेत उमेदवारी मागे घेण्याचा शुक्रवार 21 नोव्हेंबर शेवटचा दिवस आहे आज दिवसभर अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घ्यावे यासाठी मन धरणी सुरू होती तर या निवडणुकीत भाजप शिवसेना तीर्थक्षेत्र विकास आघाडी तिरंगी लढत होण्याची दृष्टीने त्यातील नेते मंडळीच्या पक्षातील नेते मंडळीच्या बैठका सुरू होत्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख युवक जिल्हाध्यक्ष अनिल पाटील तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नेते भारत पाटील आनंदराव पाटील यांच्या बैठकीकडे विषय लक्ष होते तर शिवसेनेने शिंदे गटाचे नेते सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांनी भाजप व राष्ट्रवादी नाराज झालेल्या कार्यकर्त्यांचा प्रवेश शिवसेनेत करण्यामध्ये धुमधडाका लावला आहे भाजपचे नेते जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख गटाचे कार्यकर्ते शिवसेनेत घेण्यासाठी मोठी राजकीय फिल्डिंग लावली आहे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पंढरीनाथ नागणे योगेश नाईक नवरे मधुकर सागर यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला उद्या अर्ज मागे घेण्याचे अंतिम मुदत आहे अपक्षांची बंडखोरी थांबवणे गेली दोन दिवस जोरदार प्रयत्न सुरू आहेत
नगर पंचायत आटपाडीच्या निवडणुकीमध्ये सात जणांनी नगरसेवक पदाचे उमेदवारी अर्ज मागे घेतले
By -
November 20, 2025
0
Post a Comment
0Comments