लाखो भाविकांच्या उपस्थितीत खरसुंडी सिद्धनाथ देवस्थान ची यात्रा उत्साहात

Admin
By -
0

 नाथ बाबाच्या नावानं चांगभलं देवाच्या काठी चांगभलं आज खरसुंडी परिसर भावी भक्ताच्या जय घोषाने दुमदुमला महाराष्ट्रातील प्रसिद्ध असणाऱ्या खरसुंडी तालुका आटपाडी येथील श्री सिद्धनाथ देवस्थानची सासनकाठी यात्रा लाखो भाविकांच्या उपस्थित मोठ्या उत्साहात पार पडली माणदेशातील जातिवंत खिलाराचा जनावरांचा बाजार सुरू झाला आहे या यात्रेत जनावरांची खरेदी विक्रीचे व्यवहार आज पासून सुरू झाले खरसुंडी येथील यात्रेसाठी महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र राजस्थान तामिळनाडू केरळ आधी राज्यातून मोठ्या प्रमाणात भावीक भक्त कालपासूनच खरसुंडीत सिद्धनाथ दर्शनासाठी आपापल्या शासनकाठी घेऊन येऊ लागले होते पायी चालत सायकल मोटरसायकल खाजगी वाणे एसटी बसेस ट्रक टेम्पो आदि वाहनातून भाविक लोक खरसुंडी येथे आले होते आज सकाळी देवस्थान मंदिरात धार्मिक पद्धतीने पूजा विधी झाला विटलापूरचे बाड आणि धावडवाडी मुस्लिम समाजाची कार्यकर्त्यांनी यात्रेत फिरून भक्तगणांना निमंत्रण दिले आटपाडीचे देशमुख घराण्याला पालखी पूजनाचा मान आहे पंचायत समितीचे माजी सभापती हर्षवर्धन राजेंद्र देशमुख यांच्या हस्ते पालखीचे पूजन मंदिरात झाले त्यानंतर मंदिर परिसरात एकेक करून शासनकाठी उभा राहिल्या मंदिरात नैवेद्य दाखवण्यात आला त्यानंतर सिद्धनाथ मंदिर ते जोगेश्वरी मंदिर अशी सासनकाठी मिरवणूक मिरवणूक निघाली हलगीच्या तालावर नाचत गात जयघोष करीत गुलाबाची उधळण करीत या मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते उन्हाचा प्रचंड तडाका होता त्याला न जुमानता भाविकांनी सासनकाठी मिरवणूक काढली भक्तगणांनी गुलाल खोबऱ्याची उधळण सासन काठावर केली त्यामुळे एकच गर्दी झाली यात्रेसाठी पोलीस उपाधीक्षक विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दौलतराव पुजारी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संतोष पुजारी सरपंच इंगवले तहसीलदार शितल बंडगर पोलीस प्रशासन व्यापारी ग्रामस्थ देवस्थान ट्रस्ट प्रशासन ग्रामपंचायत पदाधिकारी विविध संस्था भावी भक्त यांनी यात्रा पार पाडण्यासाठी प्रयत्न केले महाराष्ट्रातील दरवर्षी चैत्र महिन्यात खरसुंडी यात्रेसाठी लाखो भाविक येत असतात एसटी महामंडळाने प्रवाशांसाठी ज्यादा एसटी बसेसची सोय केली होती पिण्याचे पाणी टँकर प्रसाद नाश्ता आधी सोयी यात्रेत केल्या होत्या दिवसभर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची रांग लागली होती यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली


Post a Comment

0Comments

Post a Comment (0)