अभियंता महेश कुमार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त स्वच्छता कामगारांचा सत्कार व भेटवस्तू

Admin
By -
0


"माझं शहर आटपाडी मला स्वच्छच पाहिजे" या नागरिकांच्या भावना आणि घोषवाक्य  घेऊन  अनेक दिवस कार्यरत असलेल्या  इंजिनिअर महेशकुमार पाटील आणि त्यांची टीम यांनी त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 24 डिसेंबर 2024 रोजी सकाळी साडेसात वाजता आटपाडी शहरांमध्ये आणि नगरपंचायत क्षेत्रामध्ये स्वच्छता करणाऱ्या सर्व सफाई कामगार बंधू-भगिनींना सफाई करत असताना अचानक एकत्रित बोलून त्यांच्यासाठी भेटवस्तू दिल्या आणि त्यांचा उचित सन्मान केला आणि त्यांच्या समवेत वाढदिवस साजरा केला. सफाई कामगार बंधू-भगिनींना प्रोत्साहन म्हणून शहरातील नागरिकांना स्वच्छतेबद्दल जागरूकता  म्हणून आणि आपलं आटपाडी शहर स्वच्छ आणि स्वच्छच व्हावं यासाठी एक चांगला संदेश जावा यासाठी सकाळी साडेसात वाजता सर्व सफाई कामगार बंधू-भगिनींचा फेटा बांधून त्यांना भेटवस्तू देऊन आपल्या शहरातील नागरिक म्हणून त्यांचा सन्मान केला.

यावेळी, इंजिनीयर महेश कुमार पाटील, निलेश गायकवाड, विकास भुते, माजी सरपंच शिवाजीराव पाटील, काँग्रेसचे प्रांतिक सदस्य डी एम पाटील सर, संभाजी पाटील शेठ, संदीप पाटील, प्रशांत जोडगे, गणेश कोळी, मधुसूदन लोखंडे, सूर्यकांत यादव, कार्तिक एकतपुरे, विलास खंदारे, विलास पाटील, भागवत पाटील इत्यादी नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)