खानापूर निवडणुकीमध्ये निवडणूक निकालाबाबत कार्यकर्त्यांच्या पैजा

Admin
By -
0



सुहास बाबर

वैभव पाटील

राजेंद्र देशमुख

 खानापूर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक निकालाची प्रतीक्षा सर्वांना लागून आहे चुरशीने निवडणूक झाल्यामुळे कोण निवडून येणार या बद्दल पैजा लागले आहेत खानापूर विधानसभा मतदारसंघातून प्रमुख तीन उमेदवारामध्ये निवडणूक लढत आहे महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे सुहास बाबर महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे वैभव दादा पाटील आणि अपक्ष उमेदवार राजेंद्र अण्णा देशमुख यांच्यामध्ये कोण निवडून येणार याबद्दल राजकीय अंदाज समर्थक कार्यकर्त्याकडून व्यक्त होत आहेत आपलाच उमेदवार निवडून येणार या निवडणुकीत मतदारांना पैशाचेही वाटप केले गेल्यामुळे मताधिक्य वाढले त्याचा फायदा नेमका कोणाला होणार या निवडणुकीत सर्वात जास्त खर्च कोणी केला यालाही निवडणूक निकालाच्या दृष्टीने अधिक महत्व आहे पक्ष निष्ठेपेक्षा सोईस्कर निर्णय नेते व कार्यकर्त्यांनी घेऊन या निवडणुकीत उमेदवारांना पाठिंबा दिला या निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्री उदय सामंत खासदार अमोल कोल्हे खासदार सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आमदार विश्वजीत कदम आमदार नीलम ताई गोरे यांच्या सभा मतदार संघात निवडणुकीच्या निमित्ताने झाल्या त्याचा परिणाम किती झाला महायुतीने महिलांना पंधराशे रुपये भाऊबीज दिली आदी विषय राजकारणात निवडणुकीत विजयाची दृष्टीने किती महत्वाचे ठरतात हे निवडणूक निकालावरून स्पष्ट होईल उद्या विटा येथे होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांच्या नजरा लागले आहेत.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)