आटपाडी ग्रामदैवत उत्तरेश्वर देवस्थानचा रथ उत्सव पारंपारिक पद्धतीने झाला शहराचे ग्रामदैवत उत्तरेश्वर देवस्थान ची यात्रा कार्तिक महिन्यातील पौर्णिमेपासून सुरू झाली होती या यात्रेचा रथोत्सव नवमीला असतो परंतु विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यावर्षी गुरुवारी रथोत्सव पार पडला देवस्थानचे अध्यक्ष राजेंद्र अण्णा देशमुख आणि मानकरी यांच्या हस्ते रथाची पूजा करण्यात आली रथ ओढण्याचा मान माळी समाजाचा आहे धार्मिक व पारंपारिक पद्धतीने मंदिरात सकाळपासून कार्यक्रम पार पडले दुपारी रथाची मिरवणूक काढण्यात आली शुक्र ओढा परिसरात यात्रेनिमित्त विविध स्टॉल मांडले आहेत ही यात्रा तीन दिवस चालणार आहे यात्रेनिमित्त शेळ्या मेंढ्यांचा बाजारही कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात पार पडला लाखो रुपयाची खरेदी विक्री दोन दिवसात झाली रथाची मिरवणूक बाजार पटांगण शुक्र ओढा सांगोला रस्ता मुख्य बाजारपेठ पुन्हा उत्तरेश्वर मंदिर अशी सर्व वाद्य काढण्यात आली भाविकांनी रथावर गुलालो खोबऱ्याची उधळण केली दर्शन घेतले
Post a Comment
0Comments