खानापूर विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे शिवसेना शिंदे गट उमेदवार सुहास अनिलराव बाबर हे 78117 मताधिक्याने विजयी झाले त्यांनी महा विकास आघाडीचे निकटचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट वैभव दादा पाटील यांचा पराभव केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने खानापूर ची जागा पुन्हा विजय मिळवला सकाळी विटा येथील बळवंत कॉलेजवर मतमोजणी प्रारंभ झाला पहिल्या फेरीपासून सुहास बाबर यांनी मताची आघाडी घेतली 18 व्या फेरी अखेर ते विजयी झाल्याचे घोषित केले सकाळपासूनच पहिल्या े फेरीपासूनच बाबर कार्यकर्त्यांनी विजय साजरा करण्यास सुरुवात केली निवडणूक निकालानंतर विटा शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली दिवंगत माजी आमदार अनिल बाबर यांचे सुहास बाबर हे सुपुत्र आहे बाबर यांच्या निधनाच्या सहानभूती मुख्यमंत्री लाडकी बहीण टेंभूची सहावी योजना मुद्दे सुहास भैया यांच्या विजयास कारणीभूत ठरले विटा शहरात विरुद्ध उमेदवार वैभव दादा पाटील पिछाडीस राहिले तर अपक्ष उमेदवार माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांना आटपाडी तालुक्यातील 14 हजारच्या वर मतदान घेता आले नाही त्यांचा दारुण पराभव झाला आटपाडीचे अस्मिता ते राजकारण उपयोगी पडले नाही अठराव्या फेरी अखेर मतदान असे सुहास बाबर शिवसेना 151942 वैभव दादा पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 74420 राजेंद्र अण्णा देशमुख अपक्ष 13534 अजितं खंदारे 599 राजेश जाधव मनस े 938 उमाजी चव्हाण रासप 993 भक्तराज ठिगळे274 संग्राम माने 366 उत्तम जाधव 83 अंकुश चवरे 161 दादासो चंदनशिवे 2183 भारत पवार 190 संतोष हेगडे 304 संभाजी पाटील 523 नोटा 747 एकूण मतदान 247907 निवडणुकीत 14 उमेदवार रिंगणात होते तीन उमेदवारामध्ये लढत झाली सांगली जिल्ह्यात सुहास भैया बाबर यांनी विक्रमी मतांनी विजयी झाले
शिवसेनेचे सुहास बाबर खानापूर मधून विजयी
By -
November 23, 2024
0
Post a Comment
0Comments