नगरपंचायत आटपाडी नगराध्यक्ष पदासाठी 22 उमेदवारी नगरसेवकासाठी 197 उमेदवारी अर्ज दाखल

Admin
By -
0

 नगरपंचायत पंचायत आटपाडीच्या नगराध्यक्ष पदासाठी एकूण 22 उमेदवारी अर्ज दाखल झाले सतरा नगरसेवक पदासाठी197 एवढे उमेदवार दाखल झाले अर्ज भरण्याच्या दिवशी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती शिवसेना शिंदे गटातर्फे सात जण नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत भाजप पक्षातर्फे तिघेजण इच्छुक आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार एक जण तीर्थक्षेत्र विकास आघाडीतर्फे तिघेजण इच्छुक आहेत राष्ट्रीय समाज पार्टी तर्फे एक जण इच्छुक आहे तर अपक्ष म्हणून सात जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आज उमेदवारांची अर्ज छाननी प्रक्रिया होणार आहे ज्या उमेदवारांना पक्षाचा एबी फॉर्म मिळाला नाही त्याचा उमेदवारी अर्ज बाद होणार आहे नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना पक्षातर्फे उमेदवारी दाखल केलेले आप्पासाहेब नानासो माळी उत्तम नामदेव बालटे राजेश शामराव सातारकर रावसाहेब शिवाजी सागर विजयकुमार बाळू माळी सतीश मधुकर जाधव पंढरीनाथ भगवान नागणे भाजप तर्फे उत्तम तायाप्पा जाधव चंद्रकांत मधुकर दौंडे स्नेहाजीत जगन्नाथ पोद्दार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार चंद्र पवार सादिक पापा मिया खाटीक तीर्थक्षेत्र विकास आघाडी सौरभ पोपट  पाटील दगडू भीमराव काळे अशोक सोपान लवटे राष्ट्रीय समाज पार्टी शुभम वसंत हाके अपक्ष हरीश धनाजी खिलारी सादिक पाप्पा मिया खाटीक गुरुप्रसाद अतुल कवडे चंद्रकांत रामचंद्र हाके लक्ष्मण मधुकर नवले संदीप बाबा फुले अक्षय दत्तू बालटे आटपाडी नगरपंचायतीची पहिली निवडणूक होत असल्याने नगराध्यक्ष पदासाठी सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नगराध्यक्ष होण्यासाठी जोरदार रस्सीखेच आहे शिवसेन चे आमदार सुहास बाबर यांच्या पक्षाचे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची संचालक तानाजीराव पाटील यांच्या गटाकडून उमेदवारी मिळावी यासाठी नगराध्यक्ष व नगरसेवकांमध्ये प्रचंड शर्यत आहे भाजप पक्षातर्फे उत्तम तायप्पाा जाधव चंद्रकांत मधुकर दौंडे स्नेहजीत जगन्नाथ पोद्दार यांचे उमेदवारी अर्ज असले तरी उत्तम तायप्पा जाधव यांची उमेदवारी आमदार गोपीचंद पडळकर व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व भाजपचे नेते अमरसिंह देशमुख याने निश्चित केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटातर्फे पत्रकार सादीक  खाटीक यांची एकतर्फी लढाई सुरू आहे तीर्थक्षेत्र क्षेत्र विकास आघाडी नेते भारत पाटील व आनंदराव पाटील यांच्या गटातर्फे तीन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत कुणबी मराठा म्हणून भारत पाटील यांची पुतणे सौरभ भैय्या पाटील यांचा अर्ज दाखल आहे राष्ट्रीय समाज पार्टी व अन्य संघटनेमार्फत शुभम हाके यांचा अर्ज आहे अपक्ष व पक्षातर्फे सादीक  खाटीक असे दोन अर्ज दाखल आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित पवार नेते व माजी आमदार राजेंद्र देशमुख व अनेक  व युवक जिल्हाध्यक्ष अनिल पाटील यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही त्यामुळे त्यांची युती कुठल्या पक्षाशी होते याच्याकडे नजरा लागल्या आहेत अपक्ष नगरसेवकांसाठी उमेदवारांची ही संख्या चारही पॅनल तर्फे मोठी आहे त्यामुळे त्यांची बंडखोरी थांबविण्यात कितपत यश येते यावरही निवडणुकी चित्र अवलंबून असणार आहे छाननी प्रक्रिया नंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी प्रयत्न करावे लागतील

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)