ओबीसी समाजाच्याआरक्षणास धक्का लागू नये आटपाडी तहसीलदारांना मागण्याची निवेदन

Admin
By -
0

 *आटपाडीत ओबीसी समाजाचे तहसीलदारांना निवेदन : आरक्षणास धक्का लावू नये, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा*



आटपाडी तालुका ओबीसी बांधवांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देऊन ओबीसी, एसबीसी, एससी, एसटी, एनटी, व्हीजेएनटी या समाजाच्या आरक्षणावर कुठल्याही प्रकारचा धक्का लागू नये, अशी मागणी करण्यात आली. आरक्षणावर गदा आली तर ओबीसी समाज महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन उभारेल, असा इशारा यावेळी देण्यात आला.


सरकारने मंत्री गटाच्या उपसमितीचे अध्यक्ष श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने मराठा समाजासाठी बेकायदा मागण्या मान्य करून हैदराबाद गॅजेटसह सहा मागण्या मान्य करणारा शासन निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा ओबीसी समाजाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला असून तो तात्काळ रद्द करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.


ओबीसी समाजाच्या विकासासाठी महाज्योती, ओबीसी आर्थिक विकास महामंडळ तसेच बारा बलुतेदारांसाठी स्थापन झालेल्या २० महामंडळांना प्रत्येकी किमान १००० कोटी रुपयांचा निधी द्यावा, विद्यार्थ्यांना शंभर टक्के शिष्यवृत्ती द्यावी, प्रत्येक जिल्ह्यात लोकसंख्येच्या प्रमाणात दोनपेक्षा अधिक वस्तीगृहे कार्यान्वित करावीत, जातीनिहाय जनगणना करून ग्रामपंचायतपासून संसदपर्यंत तसेच शासन, प्रशासन, सहकारी संस्था व खाजगी संस्थांमध्ये प्रतिनिधित्व द्यावे, अशा मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या.


या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण बालटे, बाबासो माळी, उत्तम बालटे, प्रवीण सूर्यवंशी, रावसाहेब सागर, सर्जेराव राक्षे, सोमनाथ राक्षे, जालिंदर खंडागळे, नानाआप्पा गवंड, कल्याणराव काळे, सतीश भिंगे, कैलास भिंगे, सुधाकर जाधव, राजेंद्र चव्हाण, धोंडीराम करचे, भुते ,बापूराव फुले, जगन्नाथ लोखंडे, बजरंग फडतरे, तानाजी गवळी, तुकाराम जाधव, जीवन कासार,  लक्ष्मण नवले,करण लवटे,शशिकांत सागर, समाधान बालटे, किरण चपने, विलास जाधव, सुरेश सागर, अविनाश लोखंडे, सुखदेव नवले, रेवन जाधव, दीपक राक्षे, शिवाजी बनसोडे, वीरेंद्र राऊत, अरुण नवले, सोमनाथ अडसूळ, अशोक मरगळे , सुनील सुतार, बापूसाहेब लोहार यांच्यासह ओबीसी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.


ओबीसी बांधवांच्या भावना शासन दरबारी तीव्रतेने मांडण्यात आल्या असून शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)