महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाच्या अध्यक्षपदी डॉ.गजानन कोटेवार यांची पुन्हा निवड

Admin
By -
0


 महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाच्या अध्यक्षपदी डॉ.गजानन कोटेवार यांची पुन्हा निवड

शेगाव,दि.महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाची त्रैवार्षिक निवडणूक शेगाव जि. बुलढाणा येथे आज  रविवार दिनांक ५ जानेवारी २०२५ रोजी पार पडली.राज्यभरातील १७० मतदारांपैकी १३६ मतदारांनी मतदानाचपा हक्क  बजावला. एक मत बाद झाले.राज्य ग्रंथालय संघाचे विद्यमान अध्यक्ष डॉ.गजानन कोटेवार,वर्धा यांना तब्बल ८५ मते मिळाली  तर गुलाबराव मगर यांना ४१ मते मिळाली. कोकण मधील मंगेश मस्के यांना ९ मते मिळाली तर उस्मानाबाद मधील ग्रंथमित्र वसंत सूर्यवंशी यांना शून्य मते मिळाली, ते स्वतःही मतदानास उपस्थित राहिले नाहीत. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी प्रा.डॉ गोपाल हेलोंढे यांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडून निकाल घोषित केला. खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली निवडणूक प्रक्रियेनंतर महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाच्या नियामक मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली.यावेळी लातूर जिल्ह्यातून मराठवाडा ग्रंथालय संघाचे कार्यवाह ग्रंथमित्र राम मेकले,.लातूर जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष ग्रंथ मित्र प्रभाकर कापसे ,जिल्हा ग्रंथालय संघाचे उपाध्यक्ष ग्रंथमित्र युवराज जाधव, कार्याध्यक्ष ग्रंथमित्र हावगीराव बेरकीळे, संचालक ग्रंथमित्र संतोष करमले,ग्रंथमित्र गुप्तलिंग स्वामी हे उपस्थित होते,त्यांनी नूतन अध्यक्ष डॉ.गजानन कोटेवार यांचा सत्कार करुन आगामी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.

सोलापूर जिल्ह्यातून जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष ग्रंथमित्र विजयकुमार पवार,ग्रंथमित्र गुलाबराव पाटील,कार्यवाह साहेबराव शिंदे,मार्गदर्शक ग्रंथमित्र कुंडलिक मोरे, विनोद गायकवाड, शैलेशिल्पा जाधव, अरुण जाधव,संजय सरगर ,आकाश जगताप हेहीउपस्थित होते.

डॉ.गजानन कोटेवार यांची महाराष्ट्र ग्रंथालय संघाच्या अध्यक्षपदी पुन्हा निवड झाल्याबद्दल राज्यातील ग्रंथालय पदाधिकारी व कर्मचार्‍यांनी आनंद व्यक्त केला आहे.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)