आटपाडी उत्तरेश्वर देवस्थानच्या यात्रेत ,शेळ्या मेंढ्यांची खरेदी विक्री सुरू
By -
November 15, 2024
0
आटपाडी ग्रामदैवत उत्तरेश्वर देवस्थानच्या यात्रेनिमित्त आटपाडीत शेळ्या मेंढ्यांचा बाजार भरला आहे या बाजारात लाखो रुपयांची खरेदी विक्री दोन दिवसात झाली कृषी उत्पन्न बाजार समिती आटपाडी च्या आवारात यावर्षी शेळ्या-मेंढ्यांचा बाजार भरवला आहे या बाजारासाठी हौशी मेंढपाळ शेतकरी दलाल व्यापारी मोठ्या संख्येने कालपासूनच आले आहेत बकऱ्याच्या किमती हौशी शेतकरी लाखो रुपये सांगत आहे यात्रेनिमित्त या मेंढ्यांची वाहतूक करण्यासाठी शेकडो वाहने ये जा करत आहेत यात्रेनिमित्त शेतकऱ्याला उपयोगी असे जनावरे व शेळ्या मेंढ्यांच्या साहित्याची विक्री सुरू आहे दरवर्षी माणदेशातील आटपाडी ची यात्रा कार्तिक महिन्यातील पौर्णिमेपासून सुरू होते या यात्रेसाठी महाराष्ट्र कर्नाटक राज्यातून व्यापारी शेतकरी दलाल खरेदी विक्रीसाठी आले आहेत
Post a Comment
0Comments