अमरसिंह देशमुख व अमोल बाबर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतली भेट

Admin
By -
0


 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख व अमोल अनिल राव बाबर यांनी भेट घेऊन खानापूर विधानसभा निवडणुकी संदर्भात चर्चा केली आटपाडी चा माणगंगा सहकारी साखर कारखाना पुन्हा आपल्या ताब्यात द्यावा हा कारखाना मी पुन्हा सुरू करणार आहे या कारखान्यास मदत करणाऱ्या उमेदवाराचा पाठिंबा देणार अशी भूमिका घेऊन अमरसिंह देशमुख यांनी महायुतीचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज भेट घेतली खानापूर विधानसभा मतदारसंघातून कै माजी आमदार अनिल भाऊ बाबर यांचे सुपुत्र सुहास बाबर यांना उमेदवारी दिली आहे अमरसिंह देशमुख यांनी मी अजून भाजप पक्ष सोडला नाही मला विश्वासात न घेता माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांनी महा विकास आघाडीत प्रवेश केला त्यांना पक्षाने उमेदवारी दिली नाही त्यांनी कार्यकर्त्याच्य आग्रहास्तव अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केला आमदारकी पेक्षा माणगंगा साखर कारखाना सुरू करणे हे तालुक्याच्या दृष्टीने हिताचे आहे त्यास मदत करणाऱ्यास आपला पाठिंबा राहील असे सांगून नेते मंडळीच्या भेटी घेण्यास कालपासून प्रारंभ केला आतापर्यंत विकास आघाडीचे नेते व राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तसेच आज शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली दोन्ही भेटी दरम्यान झालेल्या चर्चेचा तपशील मात्र अद्याप जाहीर केला नाही त्यामुळे त्यांच्या भेटीकडे सर्वांच्या नजरा लागले आहेत आता भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री अजित पवार ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भेटीकडे आता सर्वांचे लक्ष आहे खानापूर मतदारसंघातील निवडणुकीसाठी उमेदवारी करणारे उमेदवार व कार्यकर्ते अमरसिंह देशमुख यांच्या पाठिंब्य मिळवण्यासाठी सर्व काही प्रयत्न करत आहेत दिवाळीच्या सणा वेळी निवडणुकीची धामधूम सुरू आहे चार नोव्हेंबरला अर्ज माघारी घेण्याची मुदत आहेे तोपर्यंत अमरसिंह देशमुख यांच्या नेते मंडळीचे भेटीकडे व माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांच्या निवडणूक प्रचाराकडे सर्वांच्या नजरा आहेत

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)