खानापूर विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी 29 ऑक्टोबर रोजी एकूण 19 उमेदवारांचे 19 उमेदवारी अर्ज विटा तहसिल कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी प्रांताधिकारी डॉ. विक्रमसिंह बांदल यांच्याकडे दाखल झाले. त्यामुळे एकूण 30 उमेदवारांचे 37 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
खानापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास दि. 22 ऑक्टोबरपासून प्रारंभ झाला असून एकूण 49 उमेदवारांसाठी 108 उमेदवारी अर्जाची विक्री झालेली होती.
आजच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या आठव्या दिवशी 29 ऑक्टोबर रोजी
दुपारी तीन वाजेपर्यंत अमोल अनिलराव बाबर (अपक्ष), मोहन सोनू बागल (अपक्ष), नाथाजीराव उर्फ राजेंद्र रस्तुम देशमुख (अपक्ष), भक्तराज रघुनाथ ठिगळे (प्रहार जनशक्ती पक्ष), उमाजी मोहन चव्हाण (राष्ट्रीय समाज पक्ष), डॉ उन्मेष गणपतराव देशमुख (अपक्ष), नारायण पांडुरंग खरजे (जनहित लोकशाही पार्टी), गणेश तुकाराम जुगदर (अपक्ष), दादासो कोंडीराम चंदनशिवे (अपक्ष), संदीप गंगाधर लोंढे (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया), सचिन दिलीप गुरव (अपक्ष), उत्तम शामराव जाधव (अपक्ष), राजेश रामचंद्र जाधव (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), संभाजी जगन्नाथ पाटील (अपक्ष), दादासो पोपट घाडगे (अपक्ष), रणजित सर्जेराव पवार (अपक्ष)
प्रल्हाद हैबती गुजले (रिपब्लिकन बहुजन सेना), सुहास राजेंद्र बाबर (अपक्ष), अंकुश महादेव चवरे (अपक्ष) या एकूण 19 उमेदवारांनी 19 उमेदवारी अर्ज दाखल केले. एकूण आजअखेर 30 उमेदवारांचे 37 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. दाखल झालेल्या उमेदवारी अर्जाची छाननी बुधवार दि. 30 ऑक्टोबर 2024 रोजी होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख सोमवार दि. 4 नोव्हेंबर 2024 आहे.
Post a Comment
0Comments