तहसील कार्यालय आटपाडी समोर बसलेल्या उपोषणकर्त्यांची तब्येत बिघडली त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे टेंभू योजनेच्या आटपाडी तालुक्यातील वंचित गावासाठी असणाऱ्या सहाव्या टप्प्याच्या कामास आक्षेप घेऊन गेली चार दिवस उपोषणा सुरू आहे , बसलेल्या उपोषणकर्त्याकडे व त्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष झाले उपोषणास दिघंची येथील शेखर रणदिवे बळी रणदिवे राहुल बुधावले अशोक पवार नवनाथ रणदिवे बसले आहेत टेंभुयोजनेला क्रांतिवीर नागनाथ अण्णा नाईकवडी यांचे नाव द्यावे टेंभू योजनेचे उपविभागीय कार्यालय आटपाडी करा पाटबंधारे उप अभियंतीची चौकशी करा आंबेवाडी बॉम्बेवाडी पिंपरी खुर्द विटलापूर उंबरगाव पुजारवाडी दिघंची देशमुख वाडी कोठुळे या गावासाठी पूर्वी झालेल्या सर्वे वर वितरिकेची काम करावे अशा मागणी आहेत ,या मागण्यासाठी 13 जानेवारीपासून भाजप कार्यकर्ते सह आंदोलनात सहभागी आहेत या आंदोलकर्त्याची काल विटा माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी भेट घेऊन चर्चा केली अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांच्या कडे संपर्क साधला परंतु उपोषणकर्त्यांचे समाधान न झाल्याने चौथ्या दिवशीही आमरण उपोषण सुरू आहे उपोषणामुळे आंदोलकांची प्रकृतीबिघडल्यामुळे त्यांना रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे
टेंभूसाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांचे प्रकृती बिघडली
By -
January 16, 2025
0
Post a Comment
0Comments