मोफत वाचनालयात वाचन संकल्प महाराष्ट्र उपक्रम सुरू
By -
January 01, 2025
0
मोफत वाचनालय विद्यानगर आटपाडी येथे आज महा वाचन दिन साजरा करण्यात आला वाचनालयाचे संस्थापक स्वर्गीय बी ए भिंगे यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला वाचन चळवळीचे प्रेरणास्थान डॉ दिनेश देशमुख यांच्या हस्ते वाचन जवळ उपक्रमाच उद्घाटन करण्यात आले यावेळी, सतीश भिंगे जीवन पोळ महादेव कदम ,बाबासाहेब काटे अशोक काळे बाग अभिजीत जाधव समाधान मदने विश्वजीत चळेकर शुभम खरात यांची प्रमुख उपस्थित होते प्रारंभीसतीश भिंगे यांनी प्रमुख पाहुणे दिनेश देशमुख व जीवन पोळ यांचा सत्कार केला उपस्थित वाचकांचा सत्कार दिनेश देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला आटपाडी एज्युकेशन सोसायटीचे माजी उपाध्यक्ष स्वर्गीय बीए भिंगे यांच्या जीवनावर दैनिक सकाळचे माजी उपसंपादक सुधीर कुलकर्णी यांनी लिहिलेल्या माणमोती या पुस्तकाचे वाचन करण्यात आले विद्यार्थ्यांनी वाचनाची आवड व सवय लावली पाहिजे लहानपणापासूनच वाचन केल्यास स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा चांगला लाभ होतो मोबाईलवर बघितलेले आठ मिनिटे फक्त लक्षात राहतात तर पुस्तक वाचनाने,कायमस्वरूपी लक्षात राहते दररोजच्या जीवनात ग्रंथ हीच आपली गुरु आहेत वाचन ही काळाची गरज आहे सुसंस्कृत व संस्कृती टिकवण्यासाठी उपयोग होतो असे मत दिनेश देशमुख यांनी व्यक्त केले जीवन पोळ यांनी ,प्रास्ताविक केले महादेव कदम यांनी आभार मानले
Post a Comment
0Comments