आटपाडीत आमदार गोपीचंद पडळकर यांचे आटपाडी भव्य नागरी सत्कार व मिरवणूक
By -
December 24, 2024
0
नगरपंचायत पंचायत समिती वजिल्हा परिषदवर भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकसंघ प्रयत्न करावेत असे आव्हान आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले आज आटपाडी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर बचत धाम पटांगणावर जत विधानसभा मतदारसंघातून आमदार गोपीचंद पडळकर विजय झाल्याबद्दल नागरी सत्कार आयोजित केला होता त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात बोलत होते आज आटपाडी शहरातून आमदार गोपीचंद पडळकर यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली हेलिकॉप्टर मधून शिवाजी महाराज अण्णाभाऊ साठे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली आटपाडीतील एसटी बस स्थानकापासून मिरवणूक निघाली उंट घोडे हलगी पथक गजी ढोल यांच्यासह संत महापुरुष वेशभूषा करून डॉल्बीच्या तालावर नाचणारे युवक तसेच 51 जेसीबी द्वारे फुलाची उधळण करून या जंगी शक्ती प्रदर्शन करण्यात आले उघड्या जीपमधून आमदार पडळकर यांनी सर्वांना अभिवादन केले आमदार पडळकर यांचे बंधू माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर,ैजयंत सरगर विनायक पाटील चंद्रकांत दौडे शिक्षक नेते यु टी जाधव यांच्यासह जत तालुक्यातून आले े नेते मंडळी या मिरवणुकीत सहभागी झाले आमदार पडळकर यांचे जागोजागी स्वागत व सत्कार करण्यात आला दोन तास मिरवणूक मोठ्या जल्लोषात फटाके आतष बाजी करीत रस्त्यावर सडा रांगोळ्या फुलाची उधळण करत काढण्यात आली नागरी सत्कारा वेळी आई हिराबाई कुंड लिक पडळकर व्यासपीठावर उपस्थित होत्या नागरिक सत्कारानंतर बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले आता आपला संघर्ष संपला आहे आटपाडी तालुक्यातील जनतेने 18 वर्षे प्रेम केले त्यामुळे आज आपण दार फोडून पहिल्या दाराने आमदार झालो आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्यामुळे विकास कामे मार्गी लागतील शेती पाणी व उद्योगा तीन सूत्रे कार्यक्रम आपण हाती घेऊन खानापूर आटपाडी आणि जत भागाच्या विकासासाठी प्रयत्न करणार आहे मोठ्या प्रमाणात निधी आणून विकास कामे मार्गी लावणार आहोत राज्यात भाजपचे सत्ता आली आहे त्यामुळे अडचण नाहीभाजप सदस्य नोंदणी मोठ्या प्रमाणात हाती घेण्याचे आवाहन केले
Post a Comment
0Comments