दिवाळीच्या लक्ष्मीपूजना निमित्त बाजारपेठेत गर्दी

Admin
By -
0

 दिवाळीनिमित्त आटपाडीतील बाजारपेठेत गर्दी आज होणाऱ्या लक्ष्मीपूजनाच्या साहित्य खरेदीचे स्टॉल बाजार पटांगण चौक अण्णाभाऊ साठे चौक कॉलेज रस्ता एसटी बस स्थानक परिसर आदी भागात मांडले आहेत झेंडूची फुले हार फळे पूजेची साहित्य यांच्या खरेदीसाठी सकाळपासूनच गर्दी आहे गेली दोन दिवस दिवाळीनिमित्त सर्वच दुकानात खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली आहे शुक ओढा परिसरात फटाकेचे स्टॉल्स उभारली असून फटाके खरेदी साठी ही गर्दी आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यावर्षीची दिवाळी लवकर आली अशी भावना कार्यकर्ते व्यक्त करत आहेत महायुती शासनाने बहिणींची दिवाळी भाऊबीज गोड केली आहे त्यामुळे बाजारपेठेत महिलांची गर्दी खरेदीसाठी वाढली आहे फराळाचे दुकान मेवा मिठाई दुकान इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक वस्तू कपडे किराणा नाष्टा सेंटर हॉटेल सोना चांदीची दुकाने फर्निचर यासह सर्व दुकानात गेली आठ दिवस ग्राहकांची ये जा सुरू आहे रस्त्यावर. चौकात वाहनांची गर्दी आहे यावर्षीची दिवाळी बोनस व बहिणीच्या भाऊबीजेमुळे बाजारपेठेत आर्थिक उलाढाल वाढली शासकीय कार्यास तीन दिवस सुट्टी आहेत परगावी असणारे नोकरदार विद्यार्थी दिवाळी सुट्टीमुळे घरी परतले आहेत त्यामुळे एसटी बस खाजगी वाहने ट्रॅव्हल्स यांना प्रवाशांची गर्दी आहे


Post a Comment

0Comments

Post a Comment (0)