माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांच्या गटाची उद्या बैठकीत राजकीय निर्णय

Admin
By -
0


 खानापूर विधानसभा मतदारसंघात माजी आमदार राजेंद अण्णा देशमुख यांच्या राजकीय निर्णय कडे सर्वांचे लक्ष लागले आहे राजेंद्र अण्णांनी भाजप सोडून राष्ट्रवादी शरद पवार पक्षात अचानक प्रवेश  केल्यामुळे राजेंद्र अण्णा या निवडणुकीत तुतारी फुंकणार अशी आशा वाटत होती ते निवडणूक लढवण्यासाठी आग्रही होते खानापूर विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडी तर्फे वैभव सदाशिव पाटील यांना उमेदवारी दिली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पार्टीतर्फे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेे माजी आमदार राजेंद्र देशमुख यांना राष्ट्रवादी शरद पवार पार्टी कडून उमेदवारी मिळेल अशी आशा होती देशमुखांनी त्यासाठी आग्रही धरला होता परंतु काल रात्री मुंबईमध्ये झालेल्या निर्णयानुसार महाविकास आघाडी तर्फे वैभव पाटील  निवडणूक लढवणार आहेत अण्णांना उमेदवारी न मिळाल्यामुळे देशमुख गटातील कार्यकर्त्यामध्ये नाराजी पसरली कार्यकर्त्यांनी राजेंद्र अण्णांनी तालुक्याचा अस्मितेचा प्रश्न असल्यामुळे निवडणूक लढवावी असा आग्रह धरला मुंबई येथे झालेले निर्णयाची माहिती कार्यकर्त्यांनी दिल्यानंतर कार्यकर्ते आक्रमक झाले त्यांनी तालुक्यातील देशमुख गटाच्या सर्व कार्यकर्त्यांना बोलवून राजकीय निर्णय घ्यावा असा अट्टाहास धरला कार्यकर्त्यांनी वेगवेगळी मते यावेळी मांडली कार्यकर्त्याची मते आजमावून घेऊन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख सांगली जिल्हा मध्यवर्ती चे माजी संचालक उदयसिंह देशमुख या दोन बंधू सह उद्या सकाळी दहा वाजता कार्यकर्त्याची मते घेऊन राजकीय निर्णय घोषित करणार असल्याची सांगितले महायुतीतर्फे शिवसेना एकनाथ शिंदे गटातर्फे सुहास बाबर यांना उमेदवारी मिळाली आहे त्यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे आटपाडी तालुक्यात जिल्हा परिषदेची माजी उपाध्यक्ष सुहास बाबर व सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची संचालक तानाजीराव  पाटील यांनी कार्यकर्त्याची बैठक घेऊन एक प्रचार फेरी पूर्णही केली आहे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना जत विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे त्यांचे बंधू जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी खानापूर मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी तयारी केली आहे अर्ज भरणार आहेत गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी मिळाल्यामुळे ब्रह्मानंद पडळकर कुठला राजकीय निर्णय घेणार याकडेही सर्वांचे लक्ष वेधले आहे आटपाडी तालुक्यातून अपक्ष म्हणून संभाजीराव पाटील यांनी उमेदवारी दाखल केला आहे एकंदरीत दोन दिवस होणाऱ्या सर्व राजकीय हालचालीकडे सर्वांच्या नजरा लागले आहेत उद्या होणाऱ्या च्या बैठकीकडे उमेदवारांचे व नेते मंडळीचे लक्ष लागले आहे अमरसिंह देशमुख यांनी निवडणूक आपली भूमिका अद्याप जाहीर केली नाही त्यांच्या निर्णयाकडे राजकीय लक्ष आहे.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)