माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांचा शक्तीप्रदर्शनाने अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल
खानापूर विधानसभा मतदारसंघातून माजी समाजकल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी आज सोमवारी विटा तहसिल कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी प्रांताधिकारी डॉ. विक्रमसिंह बांदल यांच्याकडे आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करताना भिवघाट ते विटा या मार्गावरून चारचाकी गाड्यांची रॅली काढून जोरदार शक्तिप्रदर्शन पडळकर समर्थकांनी केले. रॅलीच्या माध्यमातून विटा तहसील कार्यालयात एंट्री करत निवडणूक निर्णय अधिकारी प्रांताधिकारी डॉ. विक्रमसिंह बांदल यांच्याकडे आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.
Post a Comment
0Comments