कटफळ येते ट्रकने चिरडल्याने पाच महिला मजूर ठार दोघीजणी गंभीर जखमी

Admin
By -
0

आटपाडी प्रतिनिधी

 पंढरपूर कराड रस्त्यावर बंडगरवाडी (कटफळ) तालुका सांगोला जिल्हा सोलापूर येथे ट्रकने महिलांना चिरडल्याने पाचजण महिला जागीच ठार व दोन गंभीर जखमी झाल्या ही घटना आज दुपारी चार वाजून पंधरा मिनिटांनी चिकमहूद गावाजवळ बंडगरवाडी थांब्यावर घडली या अपघातात इंदुबाई बाबा इरकर वय 50. भिमाबाई लक्ष्मण जाधव वय 45



कमल यल्लाप्पा बंडगर वय 40. 

सुलोचना रामा भोसले वय 45 

अश्विनी शंकर सोनार 13 

जागीच ठार झाल्या तर 

मनीषा आदिनाथ पंडित वय 35

मिनाबाई दत्तात्रेय बंडगर वय 50

या दोघी गंभीर जखमी झाल्या आहेत त्यांच्यावर पंढरपूर येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी पंढरपूर कराड रस्त्यावर चिकमहुद ते दिघंची रस्त्यावर बंडगरवाडी थांब्यावर कटफळ गावातील शेत काम करणाऱ्या महिला मजूर कामासाठी सकाळी गेल्या होत्या सायंकाळी शेतातील कामे संपून कटफळ येथे घरी जाण्यासाठी वाहनाची वाट बघत थांब्यावर बसल्या होत्या यावेळी अचानक पंढरपूर होऊन 20 चाकी मालवाहतूक करणारा ट्रक नंबर MH50N4757 वळणावर वळण घेत असताना चालकाचा वाहनावरून ताबा सुटल्याने बसलेल्या शेतमजूर महिलांच्या अंगावर भरधाव वेगाने ट्रक गेला या ट्रक खाली पाच महिला मजूर चिरडल्या गेल्या तर दोन महिला गंभीर जखमी झाल्या ट्रकने चिरडल्याने रस्त्यावरच शरीराचा चेंदामेंदा होऊन रक्त सांडले होते या दुर्दैवी घटनेमुळे कटफळ गावावर शोककळा पसरली अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी बंडगरवाडी येथे धाव घेतली रुग्णवाहिका बोलवून जखमींना पंढरपूर येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले या अपघाताची माहिती कळताच अपघात स्थळी मोठी गर्दी झाली शेकाप चे डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली जखमी व तात्काळ उपचार करण्याच्या सूचना दिल्या.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)