आता IPL नाही पाहू शकणार मोफत? 25 एप्रिलपासून JioCinema वर येतोय नवीन प्लॅन
JioCinema ने एक्सवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओनुसार, युझर्स, प्रेक्षक व्हिडिओदरम्यान येणाऱ्या जाहिरातींमुळे हैराण आहेत. ते जाहिरात पण उबगले आहेत. त्यामुळे कंपनी 25 एप्रिल रोजी नवीन Ad-Free सब्सक्रिप्शन प्लॅन घेऊन येत आहे. यामध्ये फॅमिली प्लॅन पण असेल. आयपीएल सामन्या दरम्यान अनेक जाहिराती येतात. त्यामुळे सामना पाहण्याच्या आनंदावर विरजण पडते.
जिओचे दोन प्लॅन
सध्या जिओ सिनेमावर आयपीएल सामने मोफत पाहता येतात. पण लवकरच सब्सक्रिप्शन प्लॅनमुळे प्रेक्षकांना सामना पाहण्यासाठी पैसे मोजावे लागण्यीच शक्यता वर्तविण्यात येत आहे. अजून जिओने याविषयीची अधिकृत घोषणा केलेली नाही. सध्या जिओ सिनेमा 2 प्रकारचे प्लॅन ऑफर करते. यामध्ये एक योजना 999 रुपये वार्षिक अशी आहे. तर दुसरा प्लॅन हा 99 रुपये प्रति महिना असा आहे. हा प्लॅन घेतला तरी तुमची जाहिरातीपासून सूटका होत नाही.
असा पाहतात मोफत सामना
सध्या प्रेक्षक जिओ सिनेमावर मोफत आयपीएल सामना पाहू शकतो. त्यासाठी युझर्सला जिओ सिनेमा ॲप डाऊनलोड करावे लागते. नंतर मॅच पाहता येते. जिओ सिनेमाने आयपीएल सामन्यासाठी, या ॲपमध्ये अनेक खास फीचर दिले आहेत. या ॲपवर अनेक भारतीय भाषेत मॅचचे समालोचन, कॉमेंट्री ऐकता येते. युझर्स 360 डिग्री कॅमरा अँगलचा वापर करु शकतात. त्यामुळे प्रेक्षकांना एकाच बाजूने नाही तर चारही बाजूने सामना पाहण्याचा आनंद लूटता येतो.
Post a Comment
0Comments